Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातुन बनावटी दारू तस्करी- अन्य अवैद्य धंदे बिनधास्तपणे सुरू..
  • वणी

वणी शहरातुन बनावटी दारू तस्करी- अन्य अवैद्य धंदे बिनधास्तपणे सुरू..

NewWaniDiary 28/04/2025

वणी : शहरातून मोठ्या प्रमाणावर बनावट दारूची तस्करी गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी सुरू आहे. या तस्करीला काही पोलीस कर्मचाऱ्याचे आश्रय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही, अवैध रेती, क्रिकेट सट्टा, मटका, जुगार, गांजा  यासारख्या अन्य गुन्हेगारी खुलेआम चालू आहेत. काही अल्पवयीन मुलंही या गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत.

पूर्वी ठाणेदार जाधव आणि अनिल बेहरानी यांच्या कार्यकाळात हे प्रकार थांबले होते, मात्र त्यांची बदली झाल्यावर हे अवैध धंदे पुन्हा वाढले.या आधी काही इमानदार पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरातील चांगले काम करत होते. आणि अवैध धंदेवर कारवाई केल्या गेले असून अवैध धंदे करणारे तस्कर वरली मटकेवाले  काही पोलीस पथकाच्या संगमत करून सामाजिक कार्यकर्त्याच्यासहाने त्या इमानदार पोलिसांच्या विरोधात वरिष्ट अधिकारी यांच्याकडे खोटे आरोपपत्र करून बदल्या व काहींना निलंबित केल्या गेल्या.जिल्ह्याच्या पोलीस पथकांचे वणीतालुका बनले वसुलीचे ठिकाण ही चर्चा ग्रामीण व शहरात होत असून दररोज रात्री वणीतील वसंत जिनींगला लागून प्रसिद्ध बिझनेस पार्कमधून शेकडो दारूच्या पेट्या अनेक ठिकाणी पाठवल्या जातात, आणि त्या परिसरातच अधिकारी व मोठमोठे व्यापारी राहत असल्यामुळे नागरिक भयभीत आहेत.

या बिजनेस पार्कमध्ये मुख्य तस्कराचे दुकाने नाही घर नाही या परिसरात काही नसून रात्री दिवसाला चार चाकी वाहणे उभी करून दारूचे वाहने लोडींग करण्याचे काम बिनधास्त सुरु असून अल्पवयीन मुलांनां मोटरसायकलचे लालच देऊन अवैद्य दारूच्या कामात तस्कराने सहभाग करून घेतले आहे. या परिसरातील दूर दुरून लोक खरीदी व फिरायला येत असतात. या बिजनेस पार्कचा परिसर खराब करण्याचे काम तस्कराकडून होत आहे.

या प्रकरणातील मुख्य तस्करावर अनेक जिल्ह्यांत गुन्हे दाखल असून, तो पोलीस संरक्षणात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांचाही या धंद्यांत सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराचे लक्ष संबंधित अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.

Continue Reading

Previous: राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांची चमकदार कामगिरी!
Next: भाकप स्टाईल आंदोलनापुढे जि.आर.एन.कंपनी झुकली,बेरोजगारांना सात दिवसात नौकरीवर घेण्याचे आश्वासन.. ‌‌‌

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.