
वणी – वणी पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन दिनानिमित्त रक्षाबंधन व वृक्षबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात राखीच्या आकाराची प्रतीकृती तयार केली. मुलींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून बंधु-भगिनीचे नाते दृढ केले. सर्वांनी मिळून वृक्षबंधन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
प्राचार्य राकेशकुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यास संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा व सदस्य विक्रांत चचडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रयत्नशील योगदान दिले.
