
वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील मानकी येथे स्वर्गवासी सौ. रुपाली प्रमोद वासेकर व स्वर्गवासी नथ्थु घुलारामजी वासेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद शाळेत सार्वजनिक तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात लहान मुलांसाठी प्रेरणादायी लाकडी नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांचे कौतुक करून योग्य विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच समितीकडून सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी वासेकर परिवार, समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.