Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
  • महाराष्ट्र

फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

NewWaniDiary 07/08/2025


नागपुर/मुंबई – फ्रीशीप पोर्टलवरील तांत्रिक त्रुटीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहावे लागत असून, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सुधारणा करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केली आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघातील सार्थक सर्वानंद वाघमारे या विद्यार्थ्याने २०२४-२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे M.B.B.S. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. यापूर्वी २०२३-२४ मध्ये त्याने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर येथे B.A.M.S. अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला होता. मात्र M.B.B.S. कोर्ससाठी प्रवेश मिळाल्यानंतर त्याने B.A.M.S. कोर्स रद्द करून शासनास चार वर्षांची ट्युशन फी व एकूण फ्रीशीप रक्कम रुपये ३ लाख परत केली आहे.

तरीही समाज कल्याण विभागाच्या फ्रीशीप पोर्टलवर अशा विद्यार्थ्यांसाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, M.B.B.S. अभ्यासक्रमासाठी फ्रीशीप अर्ज अपलोड करता येत नाही. परिणामी संबंधित विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची ट्युशन फी भरावी लागत आहे, ही बाब आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून समाज कल्याण विभागाच्या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीसाठी अर्ज करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.

Continue Reading

Previous: वणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याच्या कार्यशैलीविरोधात माजी नगराध्यक्षांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
Next: स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता रिपाइंची तयारी: युतीसह स्वबळावर लढण्याचा निर्धार

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20250816_200833
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025
SAVE_20250617_215124
  • महाराष्ट्र

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर येथे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न!

NewWaniDiary 17/06/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.