Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याच्या कार्यशैलीविरोधात माजी नगराध्यक्षांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
  • वणी

वणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याच्या कार्यशैलीविरोधात माजी नगराध्यक्षांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

NewWaniDiary 05/08/2025

▪️ नगर परिषदेत लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप..


वणी : वणी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष पांडूरंग के. टोंगे यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारींचे निवेदन दि. ७ जुलै २०२५ रोजी; जिल्हाधिकारी, प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन, अमरावती, तसेच नगर विकास मंत्रालयाकडे सादर केले आहे.

या निवेदनात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची कार्यशैली, प्रशासनातील निष्काळजीपणा, आर्थिक नुकसान, भ्रष्टाचाराचे आरोप, वसूलीची दुर्लक्ष, तसेच शहरातील दलित वस्ती अंतर्गत विविध प्रलंबित विकास कामांबाबत बेफिकिरी यांचा उल्लेख करत कार्यवाहीची मागणी केली आहे.

निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे:

  • यात्रा मैदानातील भाडे व मालमत्ता कर वसूल न करणे.
  • गांधी चौक व शहरातील व्यापारी जागांची लीज नोंदणी प्रक्रियेत अनियमितता.
  • ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशांची अंमलबजावणी न करून नगर परिषदेच्या महसुलाला नुकसान.
  • डी.पी. रोडसाठी निधी असूनही काम न होणे.
  • बिअर बार व देशी दारु दुकानांकडून कर वसुलीचा मुद्दा.
  • सात संडास व मटन मार्केटसारख्या कामांवर खर्च करूनही ते वापरात न आणणे.
  • अशोक सिमेंट, टोल वसुली, तसेच इतर मालमत्तांवरील कर वसूल न होणे.
  • अतिक्रमणावर नियंत्रणाचा अभाव आणि जागा विक्रीसंबंधी गंभीर आरोप.
  • टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव व आर्थिक अनियमितता.
  • कर्मचाऱ्यांना नियमबाह्य आरोग्य भत्त्याचे वाटप.

यासह अनेक मुद्द्यांवर माजी नगराध्यक्ष टोंगे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत, संबंधित विभागांनी मुख्याधिकाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्याची व आर्थिक नुकसानाची वसुली करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.

Continue Reading

Previous: एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींचा गौरव सोहळा संपन्न
Next: फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.