Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे पहिले तालुका अधिवेशन वणी येथे संपन्न
  • वणी

आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे पहिले तालुका अधिवेशन वणी येथे संपन्न

NewWaniDiary 18/01/2025

▪️ कष्टाचे योग्य दाम मिळवून देणारी देशातील एकमेव व मोठी संघटना म्हणजे CITU – कॉ. ॲड. दिलीप परचाके

वणी :- जनतेचा आरोग्याचा प्राथमिक दुवा असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांना मात्र आपल्या कष्टाचे दाम प्राप्त करण्यासाठी शासनाशी भांडावे लागते आहे. यासाठी CITU संघटना अग्रेसर राहून संघर्ष करीत आहे. सिटू ही कामगार संघटना समाजातील सर्वच कामगारांचा प्रश्नावर लढणारी देशपातळीवरील सर्वात मोठी संघटना आहे आणि आशा व गटप्रवर्तकांना त्यांचे हक्काचे दाम मिळविण्यासाठी एकमेव संघटना आहे, असे प्रतिपादन आशा व गटप्रवर्तक संघटना (सिटू) च्या पहिल्या वणी तालुका अधिवेशन प्रसंगी उद्घाटक म्हणून कॉ. ॲड. दिलीप परचाके यांनी केले.

ह्या पहिल्या वणी तालुक्याचा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशा व गटप्रवर्तक संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.सरिता दानव उपस्थित होत्या.

अधिवेशनाचा सुरुवातीला लाल झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर शहिदांना व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर तालुक्याचा संघटनेचा अहवाल कॉ. प्रीती करमनकर यांनी मांडला. ह्यावर चंदा मडावी, मेघा बांडे, कुंदा देहारकर, ताई डोंगरे, मीनाक्षी थेरे यांनी आपली मते मांडून अहवालाला पाठिंबा दिला. अध्यक्षपदावरून बोलताना कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी संघटनेचे महत्त्व विषद केले तर कॉ. सरिता दानव यांनी संघटना वाढी साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

कॉ. उषा मूरखे यांनी आशांना त्यांचा प्रश्नांवर का संघर्ष का करावे लागते हे विषद करून ९ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा अधिवेशनाची माहिती दिली.
या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी १३ सदस्यीय तालुका कमिटी निवडण्यात आली. अध्यक्षपदी कॉ. मेघा बांडे, उपाध्यक्ष पदी कॉ. जयश्री सोनटक्के, सचिवपदी कॉ. सुनिता डवरे, सहसाचिवपदी कॉ. वर्षा गोवारदिपे, संघटकपदी कॉ. मीनाक्षी थेरे तर कॉ. निशा रामटेके, कॉ. पायल नालमवार, कॉ. ईशा भालेराव, कॉ. चंदा पथाडे, कॉ. शुभांगी डोंगरे, कॉ. किरण बोंसुले, कॉ. रंजना डांगे, कॉ. शीला नळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनाला तालुक्यातील अनेक गावातील आशा व गट प्रवर्तक यांची मोट्या संखेने उपस्थिती होती.

Continue Reading

Previous: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होतोय महाराष्ट्र!
Next: महाराष्ट्र राज्य किसान सभेची दिनांक 18 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित राज्यव्यापी संघटनात्मक परिषद व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराची आज कर्जत, जिल्हा रायगड येथे सुरूवात झाली.

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.