Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शेतकरी मंदिराजवळ नालीवरील सिमेंट स्लॅबच्या लोखंडी सळ्या बाहेर; अपघाताची भीती, नगरपालिकेने तातडीने दखल घ्यावी
  • वणी

शेतकरी मंदिराजवळ नालीवरील सिमेंट स्लॅबच्या लोखंडी सळ्या बाहेर; अपघाताची भीती, नगरपालिकेने तातडीने दखल घ्यावी

NewWaniDiary 23/07/2026

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील शेतकरी मंदिराजवळ मुख्य रस्त्यावर नालीवर टाकण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट स्लॅबमधून अंदाजे दीड फूट लांबीच्या पाच ते सहा लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून डांबरी थर उखडला असून गिट्टी उघडी पडली आहे. अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने गिट्टी-चुरी टाकून रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.

या मार्गाने दररोज शाळकरी विद्यार्थी, ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच कब्रस्थानाकडे जाणारे नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. एखाद्या पादचाऱ्याच्या पायात लोखंडी सळी घुसल्यास गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर होऊ शकते. तसेच दुचाकी व इतर वाहनांचे टायर पंचर होण्याचाही धोका आहे.

विशेष म्हणजे, या परिसरात काही राजकीय नेत्यांची निवासस्थाने असूनही ही धोकादायक परिस्थिती अद्याप कायम आहे. हा प्रभाग सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जातींसाठी राखीव वार्ड आहे.

नागरिकांनी वणी नगर परिषद प्रशासनाला उघड्या लोखंडी सळ्या तातडीने काढून स्लॅबची दुरुस्ती करण्याबरोबरच खड्डे बुजवून रस्त्यावर गिट्टी-चुरी टाकण्याची मागणी केली आहे. कोणताही अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Continue Reading

Previous: पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थी आंदोलन; जंतर-मंतर आंदोलनाला विविध राज्यांतून पाठिंबा
Next: राहुल गांधींची पत्रकार परिषद; विद्यार्थ्यावर पेलेट गन हल्ल्याचा आरोप, मोदी सरकारकडे कारवाईची मागणी

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.