Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातील रस्त्यांची दुर्दशा – गरोदर महिलांना त्रास, नागरिकांत संताप
  • वणी

वणी शहरातील रस्त्यांची दुर्दशा – गरोदर महिलांना त्रास, नागरिकांत संताप

NewWaniDiary 28/06/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. उपविभागीय अधिकारी निवासस्थानासमोरील रस्त्यावर मोठा खड्डासारखा (गचका) पडलेला असून, पावसाळ्यात त्यात पाणी साचल्याने तो (गचका) दिसत नाही. याच ठिकाणी सा.बा. उपविभागीय कार्यालय आणि त्यासमोर माजी आमदार यांचे निवासस्थान असून, तरीही रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

खड्ड्यांमुळे गरोदर महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये गर्भपात (मिसकॅरेट) झाल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे ‘या दुर्दैवी घटनांसाठी जबाबदार कोण?’ असा सवाल नागरिक विचारत आहेत. विशेषतः नवविवाहित महिलांना याचा गंभीर फटका बसत असून, अनेक कुटुंबांत संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील दीपक चौपाटी पोलिस चौकी ते जंगलीपीर दर्गा दरम्यान रस्ता संपूर्ण खड्ड्यांनी भरलेला असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेवर कोणतीही कारवाई न करता उलट दुरुस्तीचे बिले काढण्यात आल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून रस्त्यांची डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, अशा गंभीर प्रश्नावर स्थानिक राजकारणी नेते गप्प का आहेत? असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

Continue Reading

Previous: वणीतील शाळेत नवख्या विद्यार्थ्यांचे स्वागत; शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप..
Next: सुजाता थिएटर वणी मे ता.4 जुलै से 🎬 ‘जुरासिक वर्ल्ड’ रोजना 4 शो मे..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.