Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • खड्ड्यांमुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे हाल – वणीतील नागरीकांची नगर परिषदेकडे विनंती
  • वणी

खड्ड्यांमुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे हाल – वणीतील नागरीकांची नगर परिषदेकडे विनंती

NewWaniDiary 02/08/2025


वणी (प्रतिनिधी) – शाळा क्रमांक ३ समोरील खुल्या मैदानातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिक ग्रामिण रुग्णालय, वणी येथे जाण्यासाठी मार्गक्रमण करतात. मात्र सद्यस्थितीत या मैदानात मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्या खड्ड्यांत पाणी साचल्याने नागरिकांना आणि रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, रुग्ण, शाळेतील विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि महिलांना या रस्त्यावरून चालणे अत्यंत धोकादायक झाले आहे.

या पार्श्वभूमीवर वणीतील प्रशांत गाडगे, कपील मेश्राम आणि रोहित डोंगरे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सदर मैदानातील खड्ड्यांमध्ये तातडीने हार्ड मुरुम टाकण्याची मागणी केली आहे.

या समस्येवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Continue Reading

Previous: वणी येथे;कृषि विभागाच्या वतीने किसान गोष्टी व चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Next: वणी पब्लिक स्कूल व हिंदी विद्यालयात ८०० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.