
वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ६ अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेतून निवडून आलेल्या नगरसेविका व माजी नगराध्यक्ष करुणा रविंद्र कांबळे यांचा नवीन वर्षाच्या प्रारंभी दि. १ जानेवारी २०२६ रोजी माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना रायपुरे यांनी नगरसेविका करुणा कांबळे व रवींद्र कांबळे यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाल परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मदन झिलपलीवार, दिनेश रायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
