Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • भाकप यवतमाळ तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न!
  • यवतमाळ

भाकप यवतमाळ तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न!

NewWaniDiary 07/03/2025

▪️ काॅ.ईश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेरनिवड..


    यवतमाळ – स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे कॉ.गुलाबराव उमरतकर(राज्य कौंसिलर,किसान‌ सभा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. विजय ठाकरे (जिल्हाध्यक्ष ,आयटक) यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन कॉ.सुनिल गेडाम(राज्य कौन्सिलर, भाकप),काॅ.हिम्मतराव पाटमासे,काॅ.दिवाकर नागपुरे(सचिव मंडळ सदस्य,भाकप),कॉ.दिलीप महाजन(तालुका सचिव भाकप , नेर) हे उपस्थित होते.याप्रसंगी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.पक्षाचे सभासद वाढविणे, पक्षाच्या तालुका जनआघाड्यां कार्यान्वित करणे,शाखा बांधणी करणे,तालुक्यातील समस्या घेऊन आंदोलन उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरले.

    नविन कौंसि लने पुढील तीन वर्षांकरीता कृती कार्यक्रम अधिवेशनात मांडला व तो सर्वांनी एकमताने मंजुर केला.शेवटी 21 सदस्यीय तालुका कौंसिलची निवड करण्यात आली त्यामध्ये कॉ.ईश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेरनिवड करण्यात आली तर सहसचिवपदी १)कॉ.ॲड.अरूण जवके २) कॉ.ज्योती रत्नपारखी ,तर कोषाध्यक्ष कॉ.विजया वडतकर व तालका कौंसिल सदस्य म्हणुन कॉ.हीम्मत‌ पाटमासे, कॉ.संजय भालेराव,कॉ.दिवाकर नागपुरे,कॉ.गया सावळकर,कॉ.विजय ठाकरे,कॉ.ममता पाटील, कॉ.किशोर सालपे,सविता कट्यारमल,सुशील घोटेकार,हरीहर‌ जोशी यांचा समावेश आहे.अधिवेशनाचे संचालन काॅ.संजय भालेराव यांनी तर आभार‌ प्रदर्शन‌ तालुका सचिव काॅ.ईश्वर दरवरे यांनी‌ मानले.यावेळी पक्षाचे अनेक सभासद उपस्थित होते.

    Continue Reading

    Previous: महाबोधी महाविहार बुध्दगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे..
    Next: महिला दिन स्पेशल – महिला व पुरुष उद्योजिकांसाठी सुवर्णसंधी!

    Related Stories

    SAVE_20260212_191015
    • यवतमाळ

    देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

    NewWaniDiary 13/02/2026
    SAVE_20251209_142131
    • यवतमाळ

    शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह

    NewWaniDiary 09/12/2025
    SAVE_20251116_211916
    • यवतमाळ

    सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय  

    NewWaniDiary 16/11/2025
    Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.