
वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ (SC पुरुष आरक्षित) मध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध समाजघटकांतील कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात सक्रिय तरुण तसेच आधी निवडणूक लढवलेल्या काही व्यक्तींना पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काहींची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
रा. दामले नगर येथील संदीप खोब्रागडे हे पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रा. भीमनगर येथील कपिल मेश्राम यांचे नावदेखील चर्चेत आहे. प्रभागात ही आणि काही इतर नावे मतदारांमध्ये सध्या चर्चेत असून पुढील काही दिवसांत उमेदवारींची संख्या वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदार अधिक सजगपणे आपला प्रतिनिधी निवडतील, अशी चिन्हे प्रभागात दिसत आहेत.
