Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मतदारांचा कल बदलतोय; प्रभाग ५ मध्ये संदीप खोब्रागडे ‘फरक’ निर्माण करताना दिसत
  • वणी
  • राजकीय

मतदारांचा कल बदलतोय; प्रभाग ५ मध्ये संदीप खोब्रागडे ‘फरक’ निर्माण करताना दिसत

NewWaniDiary 01/12/2025

▪️पुरुष गटातून संदीप खोब्रागडे आघाडीवर..

वणी (प्रतिनिधी): यंदाच्या वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) चे SC पुरुष गटातून नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप खोब्रागडे हे मतदारांच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून पुढे येत असून त्यांच्या नावाभोवती मोठी राजकीय चर्चा रंगत आहे.

संदीप खोब्रागडे हे रायपुरे कुटुंबाचे जावई असल्याने, प्रभागात राजकीय व सामाजिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या या कुटुंबाचा त्यांना नैसर्गिक असा मजबूत आधार लाभत आहे. त्यांच्या सततच्या नागरिकांशी संपर्कामुळे पाठिंब्याची लाट वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये याच प्रभागातील SC गटातून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनी प्रभागात विशेष कामगिरी न केल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे. यंदा पुन्हा तेच उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांनी त्यांना नाकारल्याच्या चर्चा सोशल मीडिया व स्थानिक वर्तुळात वेगाने पसरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि अनुभवी मतदार हीच भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

प्रभागातील राजकारण संदीप खोब्रागडे यांच्या उमेदवारीमुळे तापले असून त्यांनी राबविलेल्या काटेकोर रणनीती आणि प्रभागनिहाय प्रचार मोहिमेमुळे शिंदे गटाने विरोधकांसमोर नवीन राजकीय समीकरण उभे केले आहे.

त्यामुळे, या निवडणुकीत शिवसेनाचे धनुष्यबाण चिन्हावर मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने संदीप खोब्रागडे दमदार पावले टाकताना दिसत आहेत.

प्रभाग क्र. ५ मध्ये पुरुष गटातून दुहेरी लढत होण्याची चिन्हे दिसत असून दि. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ५ मध्ये कपिल मेश्राम यांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा; आजची प्रचार रॅली उत्साहात
Next: डॉ. सचिता नगराळे यांची ठाम भूमिका; वणीकरांची पहिली पसंती ठरताना

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.