Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शाळा क्र. ९ येथे मतदानाचा वेग वाढला; समर्थकांच्या गर्दीत खोब्रागडे चर्चेत
  • वणी
  • राजकीय

शाळा क्र. ९ येथे मतदानाचा वेग वाढला; समर्थकांच्या गर्दीत खोब्रागडे चर्चेत

NewWaniDiary 02/12/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ५ मधील दामले नगर येथील शाळा क्र. ९ मतदान केंद्रावर मतदानाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. येथे खोली क्र. १ मध्ये ३९५ तर खोली क्र. २ मध्ये ४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, दुपारी सुमारे ३ वाजेपर्यंत ही आकडेवारी नोंदवली गेली आहे. या प्रभागात दामले नगर, काही ग्रामीण भाग तसेच काही तेली फैल परिसर यांचा समावेश आहे.

दरम्यान, मतदान केंद्र परिसरात मतदारांची वाढती गर्दी दिसत असून वातावरण अधिकच तापत आहे. पुरुष गटातील उमेदवार संदीप खोब्रागडे यांच्या बाजूने वातावरण जोरदार फिरताना दिसत आहे. केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत असून, मतदारांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

स्थानिकांच्या चर्चांनुसार, प्रभागात खोब्रागडे यांना आघाडीचे संकेत मिळत असल्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे. वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांचा उत्साह कमी होत चालल्याची कुजबुजही परिसरात रंगू लागली आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग क्र. ५ मध्ये संदीप खोब्रागडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next: अंत्यविधीस स्थानिक उमेदवारांची उपस्थिती, परंतु काही माजी नगरसेवक वार्डाकडे फिरवली पाठ

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.