Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील:रहिवाशांची तहसीलमधील सेतु सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी!
  • वणी

वणीतील:रहिवाशांची तहसीलमधील सेतु सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी!

NewWaniDiary 11/02/2025

वणी – वणी तहसीलमधील सेतु सुविधा केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध कागदपत्रे सहज उपलब्ध होत होती, त्यामुळे नागरिकांचा यावर विश्वास होता.

सदर केंद्र बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जावे लागत असून, यामुळे वेळ आणि आर्थिक भार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, वणीतील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सेतु सुविधा केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली.

या मागणीसाठी अब्दुल निसार, अहमद खाँ पठाण, गुलाम रसूल रंगरेज,तनुकेश जीवने,नूतन सातपुते, अली, उज्वला सातपुते,अनिल सातपुते, वंशिका भरटकर,अनुराग काकडे,जगदीश निमसटकर,शहबाज पठाण, कुणाल भेंडाळे आणि इतर नागरिकांनी पाठपुरावा केला आहे.

Continue Reading

Previous: मारेगाव येथे:भाकप यवतमाळ जिल्हा कौंसिलची बैठक व कापूस उत्पादक परिषद निर्णय
Next: वणी तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.