Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग क्र. ५ ला दोन दिवसाआड पाणी द्या — मुख्याधिकाऱ्यांकडे दोन्ही नगरसेवकांची मागणी
  • वणी

प्रभाग क्र. ५ ला दोन दिवसाआड पाणी द्या — मुख्याधिकाऱ्यांकडे दोन्ही नगरसेवकांची मागणी

NewWaniDiary 02/01/2026

वणी (प्रतिनिधी): दि. २ जानेवारी २०२६ रोजी वणी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नियमित पाणीपुरवठा करण्याबाबतची मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. सध्या या प्रभागात पाणीपुरवठा पाच दिवसांच्या अंतराने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दामले नगर परिसरासह प्रभागातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रभागाचे नगरसेवक सोनाली प्रशांत निमकर व रितिक लक्ष्मण मामीडवार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी नोंदवल्यानंतर ही मागणी पुढे नेण्यात आली.

दर दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच दामले नगर परिसरात लवकरच नवीन बोअरवेलचे काम सुरू करण्यात येणार असून त्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या मागणीवर नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी पाणीपुरवठ्याची योग्य सोय करावी, अशी विनंती नगरसेवकांकडून मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

Continue Reading

Previous: 1974 साली झालेल्या वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नातेवाईकांकडून श्रद्धांजली
Next: अल्पवयीन पिडितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.