Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती मार्फत जलसमाधी आंदोलन..
  • वणी

कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती मार्फत जलसमाधी आंदोलन..

NewWaniDiary 27/05/2025

▪️ जलसमाधी आंदोलन दिनांक 9 जुन रोज सोमवारला मौजा उकणी गावालगत वर्धा नदीवर पाण्याच्या टाकिजवळ..

वणी : तालुक्यातील मौजा उकणी, बेलसणी या गावातील खंड नं.1 ची अंदाजे 600 एकर जमिन वेकोलि वणी एरिया निलजई ओपनकास्ट माईन्स मध्ये सन 1990 या काळात 1200 एकर जमिन संपादित केली होती. त्यानंतर 2015 मध्ये 600 एकर जमिन संपादित केल्या गेली. तसेच उकणी ओपनकास्ट माईनसाठी 1993 मध्ये 1000 एकर तसेच 2015 मध्ये 550 एकर उकणी ओपनकास्ट माईन्ससाठी संपादित केली. वरिल सर्व जमिन उकणी भौगोलिक क्षेत्रांतर्गत येत होती. त्यामुळे उकणी गावातील भौगोलिक क्षेत्रांतर्गत निलजई व उकणी माईन या दोन्ही कोळसाखाणीसाठी 85 टक्के जमिन संपादित केल्या गेली. फक्त 14 ते 15 टक्के जमिन उकणी गावातील खंड नं.1 मधील जमिन शिल्लक राहिली आहे. त्यात मौजा उकणी या गावाची पुनर्वसन प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे गावाच पुनर्वसन झाल्यास उकणी गावातील 600 एकर शेतजमिन 175 शेतकरी आहे. जर गावाचं पुनर्वसन झाल्यास त्या जमिनीवर वहिवाट करू शकणार नाही. ती जमिन त्यांना नाईलाजाने सोडावी लागेल. कारण गावाचे पुनर्वसन शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन होणार आहे. अशी आपल्याकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्व शेतक-यावर उपासमारीची पाळी येवून त्यांचे कुटुंब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात ते आत्महत्याही करण्याची दाट शक्यता आहे. असे या परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

2020 मध्ये निलजई ओपनकास्ट माईन्स डिप विस्तारीकरणा साठी जी जमिन संपादित झाली त्या जमिनीवर मोठ मोठे मातीचे उंच नियमबाहय ढिगारे टाकल्या गेले आहे. त्यामुळे उकणी गाव व शेतकरी हे मोठया संकटात सापडले आहे. त्यात जमिनीवर मातीच्या उंच ढिगा-यामुळे त्या ढिगा-याचे पाणी उर्वरित शेतीवर जमा होवून जमिनीची पोत पुर्णपणे बिघडली आहे. व मिठासारखा क्षार जमिनीच्या भुपृष्ठ भागावर पसरल्यामुळे जमिनीची पोत पुर्णतः खराब होवून उत्पादनात 80 टक्के घट झाली आहे. हेसुध्दा अतिशय गंभीर बाब आहे. त्यात उत्तर पुर्व या भागाकडून वर्धा नदी आहे. पुर्व-दक्षिण भागाकडून निलजई ओपनकास्ट माईन आहे. उत्तर पश्चिम या दिशेकडून उकणी ओपनकास्ट माईन्स आहे.

उकणी या गावाच्या चारही बाजूने मातीचे उंच ढिगारे तसेच वर्धा नदी लागून असल्यामुळे वारंवार महापुराचा तडाखा बसत असल्यामुळे उर्वरित 600 एकर जमिन दरवर्षी पुराच्या पाण्याखाली येतात. व शेतक-याचे पिक उध्दवस्त करून जातात. त्यामुळे शेतक-यांना हि उर्वरित जमिन कशी वहायची हा मोठा यक्षप्रश्न शेतक-यांच्या समोर पडल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार ही चिंता या सर्व शेतक-यांना सतावत आहे. त्यामुळे हि जमिन शेतक-यांना नाईलाजाने सोडावी लागेल. यापुर्वी संबंधित उकणी ग्राम पंचायत, गावकरी व शेतकरी यांच्यामार्फत अनेकदा मोठ्या प्रमाणात उर्वरित जमिन संपादित करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले होते. अनेकदा वेकोलि प्रशासन व स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी माजी खासदार हंसराजजी अहिर, विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, अध्यक्ष सहप्रबंधक निदेशक नागपुर, क्षेत्रिय महाप्रबंधक टाडाळी, खाण प्रबंधक निलजई उकणी ओपनकास्ट माईन अशा सर्व जमिन संपादित करण्यासाठी चर्चा झाल्या. आज पुर्ण समस्या फोल ठरल्या असून जमिन संपादनाबद्दल वेकोलि प्रशासन गंभीर दिसत नसल्यामुळे दिनांक 21 जानेवारी 2025 ला कोळसाखाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून हि समिती उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ यांच्याकडे सुध्दा दाद मागणार आहे.

यावेळी पत्रकार परिषेदेत कामगार नेते, संजय खाडे यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे अनेकांची उपस्थित होती.

Continue Reading

Previous: वणी येथील; ट्रामा केअर सुरू असूनही रुग्णांचे हाल..?
Next: उपासमारीच्या त्रासाला आपण कधी समजू शकणार

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.