Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे:मीटर रीडर कामगारांचे काम बंद आंदोलन..
  • वणी

वणी येथे:मीटर रीडर कामगारांचे काम बंद आंदोलन..

NewWaniDiary 29/01/2025

वणी – वणी येथील एम.एस.ई.डी.सी.एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने दि.२७ जानेवारी रोजी,वणी उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले
१ फेब्रुवारीपासून मीटर रीडिंग व वीज बिल वाटपाचे काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन

राज्यात फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट (प्रीपेड) मीटर बसवण्याचे काम सुरू असून, यामुळे मीटर रीडिंग व बिल वाटप करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. संघटनेने शासन व महावितरणकडे वारंवार मागणी केली आहे की, स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही या कामगारांना ६० वर्षांपर्यंत रोजगाराची हमी द्यावी.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ऊर्जा सचिवांना निवेदन देण्यात आले होते, तसेच चर्चा करण्याचे आश्वासनही मिळाले होते. मात्र, एक महिना उलटूनही कोणतीही चर्चा झाली नाही, त्यामुळे संघटनेला काम बंद आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला.

संघटनेने स्पष्ट केले आहे की, महावितरणने चर्चेअंती कामगारांच्या भविष्याची शाश्वती दिली नाही, तर काम बंद आंदोलन सुरूच राहील. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संघटनेला जबाबदार धरू नये.

यावेळी गणेश मोहितकर, सुधीर दूधलकर, राहुल महाकुलकर,सुनिल धांडे,राजु राखुंडे, सुहास मोवाडे,प्रसाद घरात,मंगेश ज़िरेकर, शंकर गोरकर, देवा भोस्कर यांसह अनेक कामगार उपस्थित होते.

Continue Reading

Previous: २६ जानेवारी संविधान अंमलबजावणी दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेत संविधान अंमलबजावणी करण्यासाठी निर्धार करू या.!
Next: कॉ. शंकरराव दानव यांचे प्रथम स्मृतिदिन निमित्त पालोती मेटिखेडा येथे मेळाव्याचे आयोजन..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.