Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरातील: क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन…
  • sport
  • वणी

वणी शहरातील: क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन…

NewWaniDiary 06/12/2024

वणी येथील दि. सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.


या क्रिकेट लीगचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष अंबादास वागदरकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.


वॉरियर्स,रायडर्स, रॉयल्स, चॅलेंजर्स, टायगर्स,पॅन्थर्स, टायटन्स आणि लॉयन्स अशा आठ संघामध्ये सदर सामने रंगतील.

या क्रिकेट लीगचे पहिले बक्षीस 5000/- दुसरे 3000/- व तिसरे 2000 /-रुपये आहे. पहिले बक्षीस संचालक मंडळ यांच्या वतीने, दुसरे बक्षीस ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र वणीचे संचालक वैभव ठाकरे सर तर, तिसरे बक्षीस धनोजे कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर सर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.


सदर सामन्यांचा आनंद घेण्यासाठी वणीकर क्रिकेटप्रेमी जनतेस आवाहन करण्यात येत आहे.
क्रिकेट लीग 2024 च्या आयोजनासाठी हॉटेल वऱ्हाडी ढाबा, हॉटेल क्षणभर विश्रांती, RCM, अभय जनरल स्टोअर्स, वागदरकर इन्फोटेक यांचे सहकार्य लाभले आहे. या क्रिकेट लीग ला यशस्वी करण्याकरिता अजय धोबे, अमोल टोंगे, मंगेश खामणकर, नितीन मोवाडे, दत्ता पुलेनवार, अरुण डवरे, मोहितकर सर, अभय पानघाटे, आशिष रिंगोले, वसंता थेटे इत्यादी मेहनत घेत आहे.

Continue Reading

Previous: महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार संजय देरकरांनी अभिवादन करून वाचणालयाला दिली भेट
Next: वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार -काॅ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.