Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026

यवतमाळ (प्रतिनिधी): दि. २० मार्च २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील दर्डानगर चौकात उभारलेल्या महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखडे तसेच नगरसेविका मीराताई वीर यांनी दिनविशेषाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सत्याग्रहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत सामाजिक समतेचा संदेश दिला.

यावेळी डॉ. वाघमारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला रुपेश पिसे, अशोककुमार कयापाक, सचिन राऊत, दीपक नगराळे, शैलेश भानवे, देवानंद लोणारे, उत्तम कांबळे, रामदास वीर, गजानन कोकाटे, भारती सावते, करुणाताई चौधरी, आशाताई नगराळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वणीत भव्य गुढीपाडवा सोहळा उत्साहात साजरा
Next: वणी शहरात भरदिवसा वेगाने धावणाऱ्या रेती ट्रॅक्टरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Stories

SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
SAVE_20251209_142131
  • यवतमाळ

शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह

NewWaniDiary 09/12/2025
SAVE_20251116_211916
  • यवतमाळ

सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय  

NewWaniDiary 16/11/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.