Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात भरदिवसा वेगाने धावणाऱ्या रेती ट्रॅक्टरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • वणी

वणी शहरात भरदिवसा वेगाने धावणाऱ्या रेती ट्रॅक्टरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

NewWaniDiary 10/04/2026

वणी (प्रतिनिधी): दि. ७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास वणी शहरात रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावत असल्याची धक्कादायक घटना घडली. साई मंदिर ते शेतकरी मंदिर तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरात या ट्रॅक्टरची बेफाम धावपळ सुरू होती. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, संबंधित ट्रॅक्टरच्या मागील भागातून मोठ्या प्रमाणात रेती रस्त्यावर सांडत असल्याचेही दिसून आले. शेतकरी मंदिर ते ग्रामीण रुग्णालय दरम्यानचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून, रस्त्यावर साचलेल्या रेतीमुळे अनेक दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. काही नागरिक अपघातातून थोडक्यात बचावले.

या घटनेनंतर शहरात भरदिवसा अशा प्रकारे रेती वाहतूक कशी सुरू आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वणी तालुक्यातील कोणत्या घाटातून ही रेती आणली जात आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. काही घाट बंद असून काहींचा लिलाव (हरास) झालेला असतानाही मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच या रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी भरली आहे की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी पुढे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी दाखल केल्याचे आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.

स्थानिकांच्या मते, काही रेती माफिया राजकीय पाठबळावर कार्यरत असून शहरात उघडपणे अवैध वाहतूक सुरू आहे. या व्यवसायात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचाही सहभाग असल्याची चर्चा आहे.

नदी घाटांवर कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याचे चित्र असून, प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Continue Reading

Previous: महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन
Next: वणी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.