Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत!
  • वणी

वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत!

NewWaniDiary 25/02/2025


वणी :- दि. 24 फरवरी रोजी सोमवारला बि.आर.जी.एफ हॉल वणी येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना जिल्हा यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्र वेरुळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात पदवीधर विषय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देव डेबरे जिल्हा कार्यकारणी सदस्य, महेश खोडके जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,नरेंद्र परोपटे अध्यक्ष पं.स.बाभूळगाव, विकास दरणे अध्यक्ष पं. स. यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी तालुका पदवीधर विषय शिक्षक संघटना कार्यकारणी गठीत करण्यात आली.

या कार्यकारणीत तालुकाध्यक्ष म्हणून नागोराव ढेंगळे, सचिव संदिप सोनटक्के, कार्याध्यक्ष गजानन जेऊरकर, कोषाध्यक्ष प्रविण ढेंगळे, उपाध्यक्ष लक्ष्मी धुर्वे, उपाध्यक्ष कुसूम डांगे, उपाध्यक्ष कुमुदिनी देवतळे, सहसचिव वासुदेव मल्लुरवार, सहसचिव गजानन तुरारे,सहसचिव महेश सुत्रावे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष विठ्ठल गेडाम, प्रसिद्धी प्रमुख महिला प्रतिनिधी प्रतिभा खडतकर, जिल्हा प्रतिनिधी विठ्ठलराव पावडे, रमेश बोबडे, मायाताई पेंदोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन जेऊरकर तर आभार संदिप ठाकरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पदवीधर विषय शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

Previous: दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू करण्याची तातडीने मागणी!
Next: वणी शहरातील;स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष!

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.