Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • नागपूर येथे;विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तिसऱ्या अधिवेशन..
  • वणी

नागपूर येथे;विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या तिसऱ्या अधिवेशन..

NewWaniDiary 13/03/2025

वणी – विदर्भ राज्य आंदोलन समितीने लोकसहभाग वाढवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी 23 व 24 मार्च 2025 रोजी नागपुरात तिसरे अधिवेशन आयोजित केले आहे. अधिवेशनात विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीवर सखोल चर्चा होणार आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, कुपोषण, बेरोजगारी व नक्षलवाद यांसारख्या गंभीर प्रश्नांवर अभ्यास करून त्यावर उपाययोजना मांडल्या जातील.

विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सिंचन, रस्ते, उद्योग, शिक्षण व आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील मोठ्या आर्थिक अनुशेषावरही चर्चा केली जाईल. विदर्भ हे सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य होऊ शकते, हे अधिवेशनात मांडण्यात येईल. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 3 नुसार केंद्र सरकारने विदर्भ राज्याच्या निर्मितीचा त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी होणार आहे.

अधिवेशनानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप,कृष्णराव भोंगाडे, बाळकृष्ण राजूरकर, राहुल खारकर,रफिक रंगरेज, नामदेवराव जेणेकर, देवांश बोन्डे,मारोतराव  बोथले ,अमित उपाध्ये,मंगेश रासेकर,संजय चिंचोळकर,अनिल गोवारदिवे,आशुतोष देशपांडे,  युवराज बोबडे,राजू पिंपळकर, प्रसन्न शिवनकर,दशरत पाटील, श्रीकांत सरमोकदम अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: 6 राज्यों में 85 लाख बच्चों का भविष्य ख़तरे में – पेपर लीक देश के युवाओं के लिए सबसे ख़तरनाक “पद्मव्यूह” बन गया – राहुल गांधी
Next: श्री गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने रंगमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक विद्यार्थ्यांना होळी आणि धुलीवंदन विषयी मार्गदर्शन..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.