वणी : येथील रेल्वे स्टेशनवर आज दुपारच्यावेळी एक अत्यंत दुःखदायक घटना घडली. एका तरुणीचा रेल्वेखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी अपघाताने रेल्वेच्या खाली आली असावी, असे सांगण्यात येत आहे. रश्मी धनराज पराते (२२) रा. शास्त्रीनगर असे या मृत तरुणीचे नाव आहे.
ही तरुणी अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत असून या अपघातात तिचा एक हात आणि पाय कटला असून रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले असून त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
