Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात; अमली पदार्थांची वाढती महामारी – एम.डी. ड्रग विक्रीप्रकरणी आरोपी अटकेत!
  • वणी

वणी शहरात; अमली पदार्थांची वाढती महामारी – एम.डी. ड्रग विक्रीप्रकरणी आरोपी अटकेत!

NewWaniDiary 31/05/2025

▪️नागरिकांनी गांजा तस्कऱ्यावर कारवाईची केली मागणी..

वणी : शहरात अलीकडे अमली पदार्थांचा वाढता सुळसुळाट चिंतेचा विषय ठरत आहे. ३१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत यात्रा मैदान परिसरात एम.डी. ड्रग विक्री करीत असलेल्या एका आरोपीस रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शहरातील इतर भागांमध्ये गांजाची खुलेआम विक्री सुरू आहे.
वर्धा, जाम, नागपूर अन्य मोट्या शहरातून गांजाचा पुरवठा होत असून, तो वणी शहरात खुलेआम विकला जात आहे. युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या नशेच्या आहारी जात असून, त्यामुळे त्यांच्या आरोग्य व भविष्यावर गंभीर परिणाम होत आहे.

स्थानिक नागरिकांनी गांजा तस्करांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “एम.डी. ड्रग्स विरोधात कारवाई झाली, पण गांजाच्या विक्रेत्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष का?” असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहरात संयुक्तिक मोहीम सातत्याने राबवून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करावे, अशी जोरदार मागणी जनतेकडून केली जात आहे.

Continue Reading

Previous: गौराळा जवळ वणी-मारेगाव मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा कहर – गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ, प्रशासन व नेते मौन!
Next: यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार भुपेंद्र सिंग अटकेत..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.