Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींचा गौरव सोहळा संपन्न
  • वणी

एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींचा गौरव सोहळा संपन्न

NewWaniDiary 04/08/2025

वणी (प्रतिनिधी) – वणी येथील सुपरिचित एंजल एकॅडमी व आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एस.बी. मेमोरियल हॉलमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

विठ्ठलवाडी व दत्तनगर येथील एंजल एकॅडमीत ब्युटी पार्लर, शिवणकाम व अन्य प्रकारचे मोफत प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो होतकरू व गरजू मुलींना यावेळी प्रमाणपत्र, मोमेंटो देण्यात आले. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एंजल एकॅडमीच्या संचालिका व संस्थेच्या उपाध्यक्षा नमिता पाटील यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका पौर्णिमा शिरभाते, एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, हेअर आर्टिस्ट डॅनी सर (नागपूर), सिलेब्रेटी मेकअप आर्टिस्ट शबाना मोटलानी (नागपूर), हेअर आर्टिस्ट दिव्या घोडसे (मुंबई), तसेच संस्थेच्या अध्यक्षा प्रीती पाटील (नागपूर) उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात नमिता पाटील यांच्या प्रस्तावनेने झाली. यावेळी मान्यवरांनी मुलींना प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार सागर मुने यांनी तर आभार प्रदर्शन समाजसेवीका सुचिता पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.

Continue Reading

Previous: भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ऍड. कुणाल विजय चोरडिया यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
Next: वणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याच्या कार्यशैलीविरोधात माजी नगराध्यक्षांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.