Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता रिपाइंची तयारी: युतीसह स्वबळावर लढण्याचा निर्धार
  • चंद्रपूर

स्थानिक स्वराज्य निवडणुकांकरिता रिपाइंची तयारी: युतीसह स्वबळावर लढण्याचा निर्धार

NewWaniDiary 07/08/2025

गडचांदूर (ता. कोरपना) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तालुका कोरपना शाखेची बैठक दिनांक २७ जुलै २०२५ रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे प्राचार्य रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत पक्षाने निर्णय घेतला की, जिथे शक्य होईल तिथे समविचारी पक्षांशी युती अथवा आघाडी करून निवडणुका लढवायच्या आणि जिथे युती शक्य नसेल तिथे स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूक लढवायची. हा ठराव एकमताने मंजूर झाला.

बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना सोलापूर येथील राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावांची माहिती देण्यात आली. सभासद नोंदणीसाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचे आणि शुल्क फक्त चेक अथवा डीडीद्वारेच स्वीकारायचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, समता सैनिक दलाला पक्षाशी पुन्हा संलग्न केल्याचे जाहीर करत गावागावात त्यांच्या शाखा स्थापनेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांची गोडी निर्माण करण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या शाखा स्थापन करण्याचेही ठरवण्यात आले.

बैठकीस अशोककुमार उमरे, भंते कश्यप, प्रा. भानुदास पाटील, चिंतामण घुले, ईश्वर आत्राम, जगदीश धवने, नेमीचंद कातकर, भिमराव भगत, प्रकाश कवाडे, शिवाजी धुपे, वारलूजी नळे, सुरजभाऊ उपरे, अनंताभाऊ रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक व संचालन अशोककुमार उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ईश्वर आत्राम यांनी केले. बैठकीचे औचित्य साधून ऐतिहासिक बुद्धभूमी येथे शिवाजी धुपे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणही करण्यात आले.

Continue Reading

Previous: फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next: वणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या उद्धट वर्तनाची तक्रार

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.