Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदी प्रशिक्षणासाठी वणी येथे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
  • वणी

शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदी प्रशिक्षणासाठी वणी येथे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

NewWaniDiary 07/08/2025

वणी (प्रतिनिधी) – ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र यांच्या वतीने ग्रामीण युवक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार – विशेषतः एससी, एसटी, एनटी, ओबीसी अशा मागास घटकांना शेतीशी संलग्न व्यवसायांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दि. ४ व ५ ऑगस्ट २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी येथे पार पडली.

कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांना शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, खेकडा पालन आदी व्यवसायांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक सौदागर सोनवले यांनी विविध व्यवसायाच्या संधी, गुंतवणूक व लाभ याविषयी माहिती दिली.

वणी, झरी व मालेगाव या तीन तालुक्यांतील शेकडो प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेत प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक झाडे यांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबडे यांनी केले.

Continue Reading

Previous: वणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या उद्धट वर्तनाची तक्रार
Next: उकणी खाणी क्षेत्रातील रस्ता व शालेय बस समस्यांबाबत संजय खाडे यांची तातडीची मागणी!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.