Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • उकणी खाणी क्षेत्रातील रस्ता व शालेय बस समस्यांबाबत संजय खाडे यांची तातडीची मागणी!
  • वणी

उकणी खाणी क्षेत्रातील रस्ता व शालेय बस समस्यांबाबत संजय खाडे यांची तातडीची मागणी!

NewWaniDiary 08/08/2025

वणी (प्रतिनिधी) – मौजा उकणी ते बोरगाव चौकदरम्यानचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या कामगार, स्थलांतरित व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपघातांची संख्या वाढली असून, कोळशाच्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पीक उत्पादनात जवळपास ८०% घट झाली असून भविष्यात ही जमीन नापीक होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर उकणी, पिंपळगाव, जुनाड परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी, क्षेत्रीय महाप्रबंधक, भालर वसाहत यांना निवेदन देण्यात आले. सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून दर्जेदार काम करून घेण्यात यावे, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.

त्याचबरोबर, उकणी गावातील विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच स्कूल बस असून, त्याची क्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे. प्रत्यक्षात उकाणीसह पिंपळगाव, जुनाड, प्रगती नगर येथील एकूण १०० हून अधिक विद्यार्थी याच बसने प्रवास करतात. विद्यार्थ्यांची भरगच्च गर्दी असलेली ही बस कधीही अपघातास निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उकणी हे प्रकल्पग्रस्त गाव असल्याने, स्वतंत्र स्कूल बस देणे ही शासनाची जबाबदारी असून, तातडीने स्वतंत्र बसची व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन संजय खाडे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी सादर केले असून, या निवेदनाची प्रत खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी यवतमाळ, एरिया पर्सनल ऑफिसर (वणी नॉर्थ एरिया), उपक्षेत्रीय प्रबंधक (उकाणी) आणि खान प्रबंधक (उकाणी) यांना देण्यात आली आहे.

Continue Reading

Previous: शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदी प्रशिक्षणासाठी वणी येथे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
Next: वणी तहसील समोर कार्तिकेय कोल वॉशरीज कामगारांचे बेमुदत आमरण उपोषण

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.