Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीकरांवर करवाढीचा अन्याय – काँग्रेसकडून सोमवारी नगरपालिकेला निवेदन
  • वणी

वणीकरांवर करवाढीचा अन्याय – काँग्रेसकडून सोमवारी नगरपालिकेला निवेदन

NewWaniDiary 21/09/2025

वणी (प्रतिनिधी) : वणी नगरपालिकेने नुकतीच नवीन मालमत्ता कर आकारणी लागू केली आहे. मात्र ही करवाढ मागील कराच्या दुप्पट ते चौपट इतकी असून, कोणताही ठराव न घेता पुढील चार वर्षांसाठी लादण्यात आल्याने नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे.

या अन्यायकारक करवाढीचा निषेध करण्यासाठी व तिची तत्काळ रद्दबातल करण्याची मागणी करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वणी नगरपालिकेला निवेदन देण्यात येणार आहे.

या प्रसंगी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेलचे सदस्य व काँग्रेस समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरीकांवरील अन्यायाविरोधात आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन काँग्रेस नेते संजय खाडे यांचे तर्फे करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: पळसोनी शाळेचे बांधकाम ठप्प – अतिरिक्त शिक्षकाची मागणी
Next: वणी नगरपालिकेच्या नव्या मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचे निवेदन

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.