Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी पब्लीक स्कुल येथे शिक्षक दिन संपन्न
  • वणी

वणी पब्लीक स्कुल येथे शिक्षक दिन संपन्न

NewWaniDiary 22/09/2025

वणी (प्रतिनिधी) – दि.५ सप्टेंबर रोजी वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
शाळेचे प्राचार्य राकेश कुमार देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुमारी आफरीन अन्सारी आणि कु. सना शेख हिने केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना अमूल्य भेट तसेच प्रेमाचे प्रतीक एक गुलाब पुष्प देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध कलेचे सादरीकरण करीत नृत्य, गीते, तसेच भाषणे सादर केली.

शिक्षकांसाठी विविध खेळ आयोजित केले. शिक्षक दिनानिमित्त जे विद्यार्थी शिक्षक बनले होते, त्यांना प्रोत्साहन देत उत्कृष्ट भूमिका पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शिक्षकांनी आपले मत व्यक्त करीत मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य राकेश कुमार देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून मुलांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक ओमप्रकाश चचडा आणि सदस्य विक्रांत चचडा यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काव्य पारखी द्वारे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Continue Reading

Previous: वणी नगरपालिकेच्या नव्या मालमत्ता कराविरोधात काँग्रेसचे निवेदन
Next: शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंत मांडवकर यांची निवड

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.