
ट्रकच्या धडकेत कुटुंब उद्ध्वस्त; तीन मुलींसह रियाज शेख आणि चार वर्षीय बालिकेचा मृत्यू
लालगुडाजवळ भीषण दुर्घटना; एका क्षणात उजाडलेले संपूर्ण कुटुंब — भाचीची उपचारादरम्यान आज (१ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता नागपूर येथे प्राणज्योत मालवली
प्रभाग क्र. ५ भीमनगर तसेच संपूर्ण वणी शहरावर शोककळा पसरली आहे. हा अपघात केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक वेदनादायी आणि अंतःकरण हेलावून टाकणारा क्षण ठरला आहे. आज वणीने पाच अनमोल जीव कायमचे गमावले.
