Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीमध्ये मुलींच्या वेशात फिरणाऱ्या तरुणांचा त्रास; नागरिकांमध्ये नाराजी
  • वणी

वणीमध्ये मुलींच्या वेशात फिरणाऱ्या तरुणांचा त्रास; नागरिकांमध्ये नाराजी

NewWaniDiary 03/11/2025

▪️अनुचित पद्धतीने लक्ष वेधणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाईची गरज..

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरात गेल्या काही दिवसांपासून काही तरुण मुलांकडून मुलींसारखी वेशभूषा, मेकअप करून लक्ष वेधून घेण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. लांब केस, चेहऱ्यावर मेकअप करून टवळेपणा व चिंचोरे वर्तन करीत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

क्लासेसला जाणाऱ्या मुलींचे लक्ष वेधण्यासाठी हे तरुण त्यांच्या मार्गावर जाऊन पोज देणे, मैत्रीसाठी विनाकारण प्रयत्न करणे असे गैरप्रकार करत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अशा वर्तनामुळे मुली आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून पालक वर्गातही नाराजी पसरली आहे.

यातील काही तरुणांची ओळख पटवणेही कठीण असल्याने, भविष्यात कोणतीही गंभीर घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने अशा टवाळखोर व बहुरूप्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत व्यक्त होत आहे. महिलांचा अपमान करणारे आणि समाजात चुकीचा संदेश देणारे असे प्रकार तातडीने रोखण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Continue Reading

Previous: शासकीय कार्यालयात ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकारी–कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – राजू धावंजेवार
Next: मारेगाव पोलीस ठाण्यातील अपहरण प्रकरणाचा उलगडा; तीन अल्पवयीनांची सुटका – आरोपी अटक

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.