Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • मारेगाव पोलीस ठाण्यातील अपहरण प्रकरणाचा उलगडा; तीन अल्पवयीनांची सुटका – आरोपी अटक
  • वणी

मारेगाव पोलीस ठाण्यातील अपहरण प्रकरणाचा उलगडा; तीन अल्पवयीनांची सुटका – आरोपी अटक

NewWaniDiary 04/11/2025

वणी (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर २०२५पासून जिल्ह्यात ‘ऑपरेशन शोध’ मोहीम सुरू असून हरवलेल्या व अपहृत अल्पवयीनांचा शोध घेण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

मारेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३०९/२०२५, कलम १३७(२) भा.द.वि. अंतर्गत तीन अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी देविदास अंगादास वावरे (वय ४४) हा तिन्ही अल्पवयीनांसह किनगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथे लपल्याचे समजले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ कारवाई करत पथकाने आरोपीला किनगाव येथून अटक केली. त्याच्या ताब्यातील तिन्ही अल्पवयीनांची सुरक्षित सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी मारेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वी आदिलाबाद टाउन, आदिलाबाद ग्रामीण (तेलंगणा) व अंबाझरी, नागपूर येथे विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे (यवतमाळ) व उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पो.उ.नि. धनराज हाके, पोहवा सुनील खांडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, पोका सलमान शेख, रजनीकांत मडावी व चालक पोहवा नरेश राऊत यांच्या पथकाने पार पाडली.

पुढील तपास पो.उ.नि. प्रविण सुळे, पोलीस स्टेशन मारेगाव यांच्याकडे सुरू आहे.

Continue Reading

Previous: वणीमध्ये मुलींच्या वेशात फिरणाऱ्या तरुणांचा त्रास; नागरिकांमध्ये नाराजी
Next: प्रभाग क्रमांक ५ मध्ये उमेदवारांच्या नावांवर वेगाने चर्चा; मतदारांचे लक्ष कार्यक्षम नेतृत्वावर

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.