
वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ हा अनुसूचित जाती (SC) महिला आरक्षित असून या प्रभागातील संभाव्य उमेदवारांबाबत स्थानिक चर्चा सुरू झाली आहे. भीमनगर येथील गौतमी अजय खोब्रागडे यांचे नाव नागरिकांमध्ये चर्चेत आल्याची माहिती मिळते. मात्र अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. आचारसंहिता लागू असल्याने सर्व हालचाली नियमांच्या चौकटीत राहूनच सुरू आहेत.
