Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ५ मध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली; मतदारांचे लक्ष विकासावर
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ५ मध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली; मतदारांचे लक्ष विकासावर

NewWaniDiary 11/11/2025

▪️ दामले नगर व दलित वस्तीतील विकासअभावी मतदारांची नाराजी व्यक्त..

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ५ मधील आरक्षित जागेबाबत स्थानिक चर्चा तापू लागली आहे. विविध इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षांकडे हालचाल वाढविली असून काही उमेदवारांच्या नावांची पक्षांकडून अधिकृत घोषणा झाली आहे. तर काही इच्छुकांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू असल्याने स्थानिक पातळीवर नव्या नावांचीही चर्चा सुरू आहे. संभाव्य उमेदवारांच्या सामाजिक कार्यातील सहभागाबाबत नागरिकांकडून विविध मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

मागील २०१६ च्या निवडणुकांमध्ये सर्वसाधारण पुरुष तसेच आरक्षित जागांतून अनेक नगरसेवक निवडून आले होते. दामले नगर वार्ड आणि इतर दलित वस्ती अंतर्गत येणाऱ्या परिसरांमध्ये विकासकामांच्या अपेक्षेने मतदारांनी त्यांना निवडून दिले होते. परंतु आता या भागातील मूलभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न सुटले नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. २०१६ मध्ये आरक्षित जागेतुन निवडून आलेल्या वेक्तीकडून विशेषतः काही वस्तींत अपेक्षित विकास न झाल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रभागात नव्या इच्छुकांची नावे पुढे येत असून मतदार पारदर्शकता, सामाजिक बांधिलकी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची क्षमता या निकषांवर उमेदवारांचे मूल्यमापन करत असल्याचे दिसून येते. काही जुन्या नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाच्या हक्काचा संदर्भ देत अनेक मतदारांनी निवडणूक ही विकासाभिमुख आणि सकारात्मक मुद्द्यांवर आधारित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आरक्षण, समान हक्क आणि लोकशाही मूल्यांचा आदर ठेवत प्रामाणिकपणे लोकसेवा करणारे उमेदवार पुढे यावेत, अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात आली.

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी अधिक जागरूक राहून विकासाचा दृष्टीकोन, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेची निष्ठा या आधारे योग्य उमेदवारांची निवड करण्याचे आवाहन स्थानिक समाजघटकांकडून करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: वणी प्रभाग ६ मध्ये गौतमी खोब्रागडे यांचे नाव चर्चेत
Next: पाटाळा पुलावर खडे; वाहनधारकांना धोका

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.