Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग १२ मधून हरिदास गेडाम अपक्ष उमेदवार; स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण
  • वणी
  • राजकीय

प्रभाग १२ मधून हरिदास गेडाम अपक्ष उमेदवार; स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण

NewWaniDiary 21/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १२-ब (ST) पुरुष आरक्षित जागेतून सामाजिक कार्यकर्ते हरिदास गेडाम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागात राजकीय चर्चांना वेग आला आहे. कर्तव्यनिष्ठ, तत्पर व जनसामान्यांसाठी निरंतर कार्य करत असल्याने गेडाम यांची ओळख एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे.

प्रभाग क्र. १२ मध्ये सेवा नगर, शास्त्री नगर, सरोदय चौक, सावरकर चौक, शारदा नगर तसेच आसपासचे उपपरिसर यांचा समावेश आहे. आगामी २ डिसेंबर रोजी या प्रभागात मतदान पार पडणार आहे.

दरम्यान, हरिदास गेडाम यांच्या अपक्ष उमेदवारीला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असून, पुरुष गटातील अधिकृत उमेदवारांच्या मतांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे. विशेषतः शास्त्री नगर परिसरात गेडाम यांच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग ४ मध्ये नारायण गोडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; चौफेरी लढतीची चिन्हे
Next: पक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू, अपक्ष मात्र चिन्हासाठी प्रतीक्षेत

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.