Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • पक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू, अपक्ष मात्र चिन्हासाठी प्रतीक्षेत
  • वणी
  • राजकीय

पक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू, अपक्ष मात्र चिन्हासाठी प्रतीक्षेत

NewWaniDiary 22/11/2025

▪️ अपक्ष उमेदवारांचे प्रश्न गंभीर: ‘चार दिवसात प्रचार कसा करणार?’..

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद २०२५ निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून २० नोव्हेंबरपासून पक्षीय उमेदवार मतदारांशी भेटीगाठी घेताना दिसत आहेत. पक्षांचे अधिकृत निवडणूक चिन्ह उपलब्ध असल्याने त्यांच्या प्रचारात कोणतीही अडचण जाणवत नाही.

दरम्यान, काही पक्षांकडून सामाजिक कार्यकर्ते आणि जबाबदार व्यक्तींची उमेदवारी कापण्यात आली असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही अन्य जबाबदार व्यक्तींनी पक्षाचे उमेदवारीला नाकारुन थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरून सामना देण्याचे ठरवले आहे.

मात्र, अपक्ष उमेदवारांना प्रचारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, २६ नोव्हेंबर रोजी च अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हाचे वाटप होणार असून, त्यानंतरच त्यांना अधिकृतरित्या प्रचार सुरू करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्ह वाटप झाल्यानंतर अपक्षांच्या हाती प्रत्यक्ष प्रभावी प्रचारासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी उपलब्ध राहणार आहे. इतक्या कमी वेळेत अध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी मतदारांपर्यंत पोहोचणे कसे शक्य होणार, असा प्रश्न उमेदवार आणि मतदारांमध्ये उपस्थित होत आहे.

दरम्यान, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या या अत्यल्प वेळेबाबत स्थानिक पातळीवर तसेच संबंधित विभागाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

Previous: प्रभाग १२ मधून हरिदास गेडाम अपक्ष उमेदवार; स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण
Next: महिला-तरुणांचा वाढता कल: प्रभाग ६ मध्ये डॉ. संचिता नगराळे लोकप्रियतेत अव्वल

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.