Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026

वणी (प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वणी येथील शिवसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त दोन महापुरुषांना मानवंदना अर्पण केली.

स्वराज्याच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगेबाबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्यात आला. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, स्वराज्य व शिस्तीचा आदर्श आणि संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश यांचा संगम रायगडाच्या पायथ्याशी अनुभवायला मिळाला.

या स्वच्छता अभियानात अजिंक्य शेंडे, राजु तुरणकर, बंडु चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे व तुषार दुरुटकर या शिवसैनिकांचा सहभाग होता.

“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” हा संदेश देत केवळ जयंती साजरी न करता कृतीतून दोन महापुरुषांच्या विचारांना मानवंदना देण्याचा आदर्श शिवसैनिकांनी घालून दिला.

Continue Reading

Previous: उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्तांचा चक्काजाम; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
Next: वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.