Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शिरपूर येथे;जागतिक महिला दिन थाटात साजरा
  • वणी

शिरपूर येथे;जागतिक महिला दिन थाटात साजरा

NewWaniDiary 15/03/2026

▪️दि. १२ मार्च रोजी महिलांनी केले कलेचे सादरीकरण..

शिरपूर : जगातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांना बरोबरीचा दर्जा मिळून त्यांना समान संधी, समान वेतन, मतदानाचा अधिकार आदी हक्क मिळावे म्हणून अमेरिकेत महिलांनी प्रदीर्घ संघर्ष केला आणि त्यातून महिलांना जागतिक स्तरावर ओळख प्राप्त होऊन महिला ह्या फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच आहेत हा भ्रम मोडीत निघाला आणि महिलांनाही पुरुषानं इतकेच सामर्थ्य असून त्या उत्पादन प्रक्रियेत तेव्हढ्याच महत्वाचा आहेत आणि वेळेप्रसंगी पुरुषांचा समोर राहू शकतात हे दाखवून दिले आहे. त्यामुळे जगात महिला दिन ८ मार्च रोजी साजरा व्हायला लागला. ह्यादिवशी अख्या जगात महिला आपल्यात असलेल्या सामर्थ्याचे, कला गुणांचे सादरीकरण करून आम्ही तसूभरही कमी नाही आहोत हे दाखवून देत असतात. हाच जागतिक महिला दिन शिरपूर येथे येथील महिलांनी एकत्र येत मोठ्या थाटात साजरा केला.

दिनांक १२ मार्च रोजी शिरपूर ग्रामपंचायतीचा पटांगणावर जागतिक महिलादिनांचा कार्यक्रम सुवर्णा बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व किरण देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळेस ज्योत्स्ना रामटेके, वेणु झोडे, सुरेखा ढेंगळे, सरपंच गणेश डाहुले, उपसरपंच मोहित चचडा, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद मंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमात गावातील महिलांनी, मुलींनी नाटिका, नृत्य, सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले. तसेच महिला दिनानिमित्त किरण देरकर, सुवर्णा बोंडे व पाहुण्यांनी यावेळी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमती बोधे यांनी केले तर सूत्रसंचालन आशू मत्ते व आभार सोनू रामटेके यांनी मानले.


कार्यक्रमाला प्रामुख्याने मनीषा ठमके मयुरी बोधे, कोमल ठावरी, मनीषा बोधे, नंदा डवरे, लता फेथफुलवार, लता गोरे, शांताबाई सलाम, कांचन ठाकरे, ज्योती खोबरे, संगीता ननकटे, वृंदा मंदे, माधुरी मंदे, प्रेमाली निकोडे, शितल गोरे, अर्चना ननकाटे, ललिता सिडाम, जया खोबरे, काजल गणवीर आदी व गावातील अनेक स्त्रिया उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले.

Continue Reading

Previous: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सुरेशभाऊ रायपुरे यांचा वाढदिवस साजरा
Next: ‘बाप’ कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.