Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • ‘बाप’ कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
  • वणी

‘बाप’ कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

NewWaniDiary 15/03/2026

वणी (प्रतिनिधी): येथील शेतकरी मंदिर येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी कवी डॉ. विनोदकुमार आदे यांच्या ‘बाप’ या कवितासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला अभिनेते तसेच सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांची विशेष उपस्थिती लाभली.

डॉ. विनोदकुमार आदे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून पुस्तकाचे मुखपृष्ठ, आतील रेखाचित्रे, ग्राफिक्स आणि टायपिंग यांसह अनेक कामे त्यांनी स्वतःच केले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे यांनी पुस्तकाच्या ब्लर्बमधून बापाच्या त्यागाचे प्रभावी वर्णन केले आहे.

‘आई’ या विषयावर अनेक साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी ‘बाप’ या विषयावर तुलनेने कमी लेखन झाले आहे. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न डॉ. आदे यांनी ‘बाप’ या कवितासंग्रहातून केला आहे. या कवितांमधून बापाचे कष्ट, त्याग, संघर्ष आणि कुटुंबासाठीची झटापट अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

प्रकाशक दत्ता डोहे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या कवितांमध्ये बुद्धांची करुणा, कबीरांचे कष्टमूल्य, तुकोबांचे निसर्गप्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा यांचे दर्शन घडते. त्यामुळे हा कवितासंग्रह प्रत्येक वाचकाने वाचावा, असे आवाहन त्यांनी केले.

Continue Reading

Previous: शिरपूर येथे;जागतिक महिला दिन थाटात साजरा
Next: महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त समतेच्या लढ्याला अभिवादन; यवतमाळ जिल्ह्यातील माकप कार्यकर्ते रवाना

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.