
यवतमाळ (प्रतिनिधी): दि. २० मार्च २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील दर्डानगर चौकात उभारलेल्या महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखडे तसेच नगरसेविका मीराताई वीर यांनी दिनविशेषाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सत्याग्रहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत सामाजिक समतेचा संदेश दिला.

यावेळी डॉ. वाघमारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला रुपेश पिसे, अशोककुमार कयापाक, सचिन राऊत, दीपक नगराळे, शैलेश भानवे, देवानंद लोणारे, उत्तम कांबळे, रामदास वीर, गजानन कोकाटे, भारती सावते, करुणाताई चौधरी, आशाताई नगराळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
