Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026

वणी (प्रतिनिधी) : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त जमात-ए-इस्लामी हिंद, वणी यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी वणी शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जमात-ए-इस्लामी हिंद, वणीच्या वतीने मागील १२ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही मानवतेच्या सेवेसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून संकलित होणारे रक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर तसेच लाईफ लाईन यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

“रक्तदान करा, जीवनदान द्या” या संदेशातून जात, धर्म, भाषा किंवा पंथाची सीमा न मानता सर्व समाजबांधवांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराचे आयोजन दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वणी येथे करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रोषणाई; आनंदाचे वातावरण
Next: मारेगावच्या दोन प्रमुख चौकांत सिग्नल, सीसीटीव्ही व ट्राफिक पोलिसांची मागणी

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.