
वणी (प्रतिनिधी) – वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ हा सर्वसाधारण महिला तसेच अनुसूचित जाती (SC) पुरुष आरक्षित असून, या दोन्ही जागांसाठी काही दिवसांत आणखी नवीन नावांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदारांचे लक्ष सध्या एका प्रमुख मुद्याकडे केंद्रित झाले आहे – विकास करणारा उमेदवार कोण? वार्डातील समस्या जाणणारा, समाजकार्यात सक्रिय आणि विकासकामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा उमेदवार कोण असावा, यावर नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
काही संभाव्य उमेदवारांना पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली असून, काही अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही उमेदवारांकडून प्रचाराच्या नावाखाली कार्यकर्त्यांच्या दररोज सायंकाळी चिकन पार्टीचे आयोजन होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तेही विरोधी पक्षातील उमेदवारांच्या माहिती घेण्याकरिता सोईसुविधा देत आहेत.
दलित वस्त्यांसह संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणारा उमेदवार कोण ठरणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
