Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • अल्पवयीन पिडितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास
  • वणी

अल्पवयीन पिडितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

NewWaniDiary 02/01/2026

वणी (प्रतिनिधी): अल्पवयीन पिडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजीत एम. देशमुख यांच्या केळापूर येथील न्यायालयात दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सुनावण्यात आली. ही घटना मौजा नायगाव, ता. वणी, जि. यवतमाळ येथील असून आरोपी हा पिडितेच्या घरासमोर वास्तव्यास होता. सायंकाळी पिडितेचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत आरोपीने पिडितेवर लैंगिक अत्याचार केला आणि कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिल्याने पिडितेने घटनेबाबत कोणास काही सांगितले नव्हते. नंतर तब्येत बिघडल्याने वैद्यकीय तपासणीदरम्यान पिडिता २० आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अजनी पोलीस ठाणे, नागपूर येथे गुन्हा नोंद झाला. गुन्हा वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो वर्ग करण्यात आला. अपराध क्र. 626/2023 चा तपास सहाय्यक पोलिस फौजदार माया चाटसे यांनी केला. विशेष न्यायालय, केळापूर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी सात महत्त्वाचे साक्षीदार सादर केले. पिडितेचे जबाब, वैद्यकीय पुरावे व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली – • POCSO कलम 6 अंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावास व ₹10,000 दंड • POCSO कलम 4 अंतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास व ₹7,000 दंड • भादंवि कलम 506 अंतर्गत 2 वर्षे सश्रम कारावास व ₹3,000 दंड सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आरोपीची बाजू अ‍ॅड. हैदरी, वणी यांनी मांडली असून पैरवी अधिकारी म्हणून पो.ना. संतोष मडावी (ब. क्र. ७९२) यांनी काम पाहिले.

Continue Reading

Previous: प्रभाग क्र. ५ ला दोन दिवसाआड पाणी द्या — मुख्याधिकाऱ्यांकडे दोन्ही नगरसेवकांची मागणी
Next: प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका करुणा कांबळे यांचा सत्कार; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शुभेच्छा

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.