
वणी – शहरातील समाजसेवक, उद्योजक आणि “आमेर बिल्डर्स” चे संचालक जमीर उर्फ जम्मू खान महेबूब खान यांच्यावर ९ जून रोजी जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांच्या आदेशाने एम.पी.डी.ए. कायद्यानुसार १२ महिन्यांसाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई केवळ राजकीय सूड आणि सट्टेबाजांच्या दबावामुळे घडवून आणली गेली असून, ती निषेधार्ह आणि अन्यायकारक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
समाजासाठी नेहमी तत्पर असलेले व्यक्तिमत्व
गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू खान हे वणी शहरातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांसाठी अन्नधान्य, औषधे, मोफत रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबीर आणि सामूहिक विवाह अशा सामाजिक उपक्रमांतून सातत्याने कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन असंख्य कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला.
राजकीय षड्यंत्र आणि खोट्या तक्रारींची मालिका
चंद्रपूर-वणी परिसरातील काही वरली मटका सट्टेबाज, जे स्थानिक राजकारणात सक्रीय असून, समाजाच्या पाठिंब्यानेच राजकीय फायदा घेत आले आहेत, काही राजकीय नेत्यांचाही सहभाग असून त्यांनीच जम्मू खान यांच्या वाढत्या लोकसंग्रहाने अस्वस्थ होऊन, खोट्या खबऱ्या आणि तक्रारी देत या कारवाईस कारणीभूत ठरले. एकीकडे कुख्यात गुन्हेगार खुलेआम फिरत असताना, दुसरीकडे समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई का? असा सवाल आज सामान्य जनतेतून विचारला जात आहे. सद्या मटका सट्टेबाजांची परिस्तिथी खबरी म्हणून अधिकाऱ्यांकडे ओळख आहे.
वैध व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीत योगदान
अवैध क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडून जम्मू खान यांनी ‘आमेर बिल्डर्स’च्या माध्यमातून रिअल इस्टेट व्यवसायात प्रामाणिक वाटचाल सुरू केली असून, अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोमीनपूरा वॉर्डात समाजात शांती आणि विकासाचे चित्र पाहायला मिळत होते.
समर्थनाचा आवाज उंचावत चालला
शहरातील अनेक युवक, समाजबांधव, व्यापारी व सामाजिक संघटना जम्मू खान यांच्या बाजूने उभे असून, या कारवाईविरोधात महाराष्ट्र पातळीवर चौकशीची मागणी लवकरच करण्यात येणार आहे. विरोधकांनी कट रचून सद्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला असून, समाजाने एकजुटीने या अन्यायाचा निषेध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
– जम्मू खान समर्थक नागरिक व सामाजिक संघटना, वणी
