
घोन्सा – जागतिक महिला दिनानिमित्त श्रीसंत गजानन महाराज श्रद्धाश्रम, घोन्सा यांच्या विद्यमाने “शाहू-फुले-आंबेडकर” विचारांचे संगीतसमृद्ध प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका, प्रबोधनकार आणि अभिनेत्री निशालाई धोंगडे या कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करतील. हा कार्यक्रम १२ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता श्रद्धाश्रम, घोन्सा येथे होणार आहे.
या उपक्रमाला अनेक महिला बचत गट आणि स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि परिवर्तनासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम सामाजिक जागरूकतेला चालना देईल.

