Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • महाविकास आघाडीत भीम आर्मीचा समावेश; वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या घडामोडींना वेग
  • वणी

महाविकास आघाडीत भीम आर्मीचा समावेश; वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या घडामोडींना वेग

NewWaniDiary 31/10/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला आणखी बळकटी मिळाली आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीनंतर, आज ३० ऑक्टोबर रोजी भीम आर्मीनेही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याची घोषणा केली.

ही घोषणा भीम आर्मीचे विधानसभा अध्यक्ष बबलु मेश्राम व तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांची वणी येथील स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या भेटीदरम्यान केली. यावेळी रा.कॉ.पा.चे तालुकाउपाध्यक्ष महेंद्र चांदोरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

२९ ऑक्टोबर रोजी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस–रा.कॉ.पा.च्या बैठकीत महाविकास आघाडीच्या स्वरूपातच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

३० ऑक्टोबरला भीम आर्मीच्या सहभागामुळे वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार झाले आहे. वणी शहर व परिसरातील भीम आर्मीची संघटनात्मक ताकद पाहता, त्यांचा आघाडीत समावेश निर्णायक ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर म्हणाले,
“भीम आर्मीच्या सहभागामुळे सामाजिक न्याय आणि समावेशकतेचा संदेश अधिक बळकट होईल. महाविकास आघाडी आता अधिक सक्षम झाली आहे.”

दरम्यान, यंदा नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने आघाडीत उमेदवार निवडीसंदर्भातील चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी जोरदार मागणी केली जात असल्याचे समजते.

महाविकास आघाडीच्या या एकजुटीमुळे वणी नगरपरिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार आहे.

Continue Reading

Previous: वणी नगर परिषद निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडचे; अजय धोबे यांची जय्यत तयारी..
Next: वणी–घुग्घुस रोडवरील लालगुडाजवळ भीषण अपघात; एका कुटुंबातील चार निष्पाप जीवांचा मृत्यू

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.