
वणी : भीम टायगर सेनाच्या वतीने १३ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वणी येथील भव्य भिम गीतांचा कार्यक्रम आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे. सायं. ६.०० वाजता कार्यक्रम होईल आणि रात्री ११.५९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीस भव्य केक कापून मानवंदना दिली जाईल.
तसेच, १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता धम्मभोजन वणी बस स्टॅन्ड समोर, आणि सायं. ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका सर्व रॅलीचे स्वागत व सत्कार केला जाईल. कार्यक्रमासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ रायपुरे व अन्य पदाधिकारी यांनी समाजबांधवाना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

