
वणी (प्रतिनिधी) : वणी शहरात पारंपरिक उत्साहात मोठा पोळा उत्सव दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी शासकीय मैदान, पाण्याची टाकी येथे साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी रुपये 3100/-, द्वितीय क्रमांकासाठी रुपये 2100/- तर तृतीय क्रमांकासाठी रुपये 1100/- बक्षिस ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी बैल जोडीस वैयक्तिक विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सौजन्य विजय चोरडिया यांचे असून या सोहळ्याचे आयोजन पोळा उत्सव समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या पारंपरिक उत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
